रोटरी स्टार, इनरव्हील क्लब, उडाण फाऊंडेशनतर्फे शेतकऱ्यांना बियाणे, खत वाटप(व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी ।  जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, अल्पभूधारक १०० शेतकऱ्यांना रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार, रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे बाय व्ह्यूतर्फे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते बियाणे आणि खत वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जिल्हा कृषी उपसंचालक अनिल भोकरे, रोटरी क्लब जळगाव स्टारचे अध्यक्ष धनराज कासट, उडाण फाऊंडेशनच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, संदीप पाटील, सागर मुंदडा, डॉ.विद्या चौधरी, चेतन वाणी, धर्मेश गादीया, डॉ.महेंद्र माल, नीरज अग्रवाल, चंद्रशेखर नेवे, रविंद्र पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले की, कोविडमुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणी आल्या आहेत. आज आपण सर्व शेतकऱ्यांना मदत करू शकत नसलो तरी ज्यांना मदत होईल त्यांचे आयुष्य काहीसे सुखकर होईल. अडचणीच्या काळात आपण विविध संस्थांच्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावलो आहेत यातून इतरांना नक्कीच प्रेरणा मिळेल असे जिल्हाधिकारी म्हणाले. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे म्हणाले की, शेतकरी हा समाजाचा महत्वाचा घटक आहे. गरजू शेतकऱ्यांना केलेली मदत नक्कीच त्यांच्या उपयोगी ठरेल आणि त्यातून इतरांना प्रेरणा मिळेल. रोटरी स्टार, उडाण फाऊंडेशन व इनरव्हीलने पुढाकार घेऊन राबविलेल्या हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार पोलीस अधिक्षकांनी काढले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज ५ गावांच्या सरपंच व शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्याकडे प्रातिनिधिक स्वरूपात बियाणे व खताची बॅग सोपविण्यात आली.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/332975711747525

 

Protected Content