चोपडा प्रतिनिधी । येथील रोटरी क्लबच्या वतीने बोरसे नगरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी रोटरीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
जगभरातील शाखांद्वारा विविध क्षेत्रातील सेवाभावी, विधायक उपक्रम राबविणा-या रोटरीच्या नूतन वर्षाची दरवर्षी एक जुलैला सुरुवात होते.
या अनुषंगाने रोटरी क्लब चोपडा तर्फे नूतन रोटरी वर्षाची सुरुवात पर्यावरण पूरक अशा वृक्षरोपण कार्यक्रमाने बोरसे नगर मध्ये डॉक्टर्स डे
,चार्टड डे , कृषी दिन व नूतन रोटरी वर्षारंभाचे औचित्य साधून करण्यात आली. या वृक्षारोपणासह नवनिर्वाचीत रोटरीचे अध्यक्ष रोटे. नितीन अहिरराव व सचिव रोटे. रुपेश पाटील यांनी डॉक्टर्स डे निमित्त चोपडा शहरातील नामवंत डॉक्टर रोटे. शेखर वारके, रोटे. डॉ. सचिन कोल्हे, रोटे.डॉक्टर वैभव पाटील, रोटे.डॉ अमोल पाटील तसेच चार्टस डे निमित्त रोटे.सी.ए पवन गुजराथी, रोटे. अर्पित अग्रवाल यांचा सत्कार करून त्यांच्याही हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
दरम्यान, कृषीदिना निमित्त रोटे.प्रफुल गुजराथी व रोटे. एल.एन.पाटील यांचा सत्कार व त्यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले. शिरपूर हरेश्वर रस्त्यावरील कै.शांताराम बोरसे नगर मध्ये झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात विविध जातींचे झाडे लावून त्यांना ट्री गार्ड लावण्यात आले. प्रत्येक झाडाला जगविण्याची जबाबदारी कॉलनी निवासी नागरिकांनी स्वतःहून घेतली.हा वृक्षरोपण कार्यक्रम फक्त एक दिवसाचा उपक्रम नसून वर्षभर विविध कॉलन्यांमध्ये मध्ये रोटरी क्लब तर्फे राबविण्यात येणार असल्याचे रोटरीचे नवीन अध्यक्ष रोटे.नितीन अहिरराव यांनी सांगितले
सदर कार्यक्रमास रोटरीचे माजी अध्यक्ष नितीन जैन, माजी सचिव धीरज अग्रवाल, एम.डब्ल्यू. पाटील, संजीव गुजराथी , सचिव रुपेश पाटील, अरुण सपकाळे, विलास कोष्टी, आशिष जयस्वाल, अविनाश पाटील, भालचंद्र पवार, चेतन टाटिया, दिलीप जैन, ईश्वर सौंदांनकर, जितेंद्र बोथरा ,ललित टाटीया, महेंद्र बोरसे, निखिल सोनवणे, पंकज बोरोले , प्रवीण मिस्त्री, प्रदीप पाटील, प्रकाश पाटील, पृथ्वीराज राजपूत, रामलाल सोमानी, शिरिष पालीवाल ,चंद्रशेखर कोष्टी तसेच कॉलनीतील रहिवासी उपस्थित होते.