सावदा ता. रावेर जितेंद्र कुलकर्णी | येथून जवळ असलेल्या रोझोदा गावातील सर्व शेतकरी याची शेती ही चिनावाल शिवारात असून त्यांना गुरे ढोर हे अगदी जास्त प्रमाणात नुकसान करत आहेत. यावर योग्य तो अंकुश ठेवण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सावखेडा बु. शिवार रस्ता ते रोझोदा शिवारातशेतामध्ये गुरा ढोरांमुळे जर नुकसान होत असतांना शेतकरी संबंधितांना बोलला तर त्याला जीवे मारण्याची धमकी देतात. केळी, मका, ज्वारी अशा विविध पिकांची नासधुस करतात. रोझोदा गावातील शेतकरी एकत्रित येऊन सावदा पोलिस स्टेशन अर्ज दिला व पिक स्वरक्षण सोसायटी चिनवाल येथे देखील अर्ज देण्यात आला. यात सर्व शेतकरी बांधवांनी आमच्या शेतामधील नुक़सान हे थाबले पाहिजे अशी विनंती केली आहे. त्या वेळेस रोझोदा येथील रमेश महाज,न चिमण धांडे, उप सरपंच दीपक धांडे, तंटामुक्ति अध्यक्ष भास्कर भंगाळे, चिनावल येथील गोपाळ नेमाड़े, श्रीकांत सरोदे व सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2667283986913719