जळगाव, प्रतिनिधी ।स्वस्त धान्य दुकानदारांच्या कोरोना काळातील सेवेबाबत विमा कवच व इतर सुविधा देण्याची मागणी शहरी व ग्रामीण सरकारमान्य रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी खासदार संजय राऊत यांना निव्देनाद्वारे केली आहे.
निवेदनाचा आशय असा की, ऑल महाराष्ट्र शाॅप कीपर फेडरेशन वतीने देशात तथा राज्यात गेल्या १८ महिन्यापासून कोरोनाचा पादुर्भाव असल्याने अशा परिस्थितीत कोणताही गोरगरीब अन्नधान्य विना राहू नये याकरिता सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजना, मुख्यमंत्री गरीब कल्याण योजना तसेच एपीएल शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वाटप राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानाद्वारे केले. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने असल्याने गेल्या १८ महिन्यांमध्ये राज्यभरातील १३८ रास्त भाव दुकानदारांचे दुःखद निधन झाले व त्यांचा परिवार रस्त्यावर आला. १० हजार ते १५ हजार रास्त धान्य दुकानदार कोरोना संसर्गाने ग्रस्त होते. अशा परिस्थितीत देखील दुकानदारांनी वरील योजनेचे काम उत्तम पणे केले व आजही करीत आहे. आज शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांच्या परिवाराचा विचार करून वरील मयत झालेल्या सर्व दुकानदारांच्या परिवारास १० लाखांची आर्थिक मदत द्यावी तसेच संसर्ग झालेल्या प्रत्येकी २ लाखांची मदत द्यावी. तसेच भविष्यातील पुढील काळात स्वस्त धान्य दुकानदारांना शासनाने ५० लाख रुपयांचा विमा सुरक्षा कवच द्यावा. दुकानदारांना महसूल न चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा. वाढती महागाई पाहता कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी. लाभार्थ्यांना २० टक्के ऑफलाइन वाटप करण्याची मुभा द्यावी.
https://www.facebook.com/508992935887325/videos/150166140391613