रावेर प्रतिनिधी । रेशन कार्ड शोध मोहीमेला शासनाकडून स्थगिती देण्यात आली असल्याची माहीती तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिली आहे.ही स्थगिती अनिश्चित कालावधीसाठी असल्याचे शासन आदेशात म्हटले आहे.
शासनाच्या रेशन कार्ड शोध मोहीमेत ज्यांचे उत्पन्न एक लाखा पेक्षा जास्त आहे आणि ज्यांना धान्य मिळते , असे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार होते. यासाठी पुरवठा विभागातर्फे तालुकाभरात सुमारे ७१ हजार रेशन कार्डच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली होती. शासनामार्फत वार्षिक उत्पन्न एक लाखा पेक्षा अधिक असलेल्या शासकीय , निमशासकीय , खाजगी नोकरी करणारे अधिकारी , कर्मचारी यांचे रेशनकार्ड रद्द केले जाणार होते. या मोहिमेत प्रत्येक रेशनकार्डाची तपासणी करण्यांत येणार होती. रेशन कार्डधारकाकडून विहीत नमुन्यातील अर्ज भरुन घेतला जाणार होता. या अर्जासोबत संबंधित कार्डधारकाला एका वर्षाच्या आतील रहिवास पुरावा , अधार कार्ड , गॅस असल्यास पुस्तक, बँक पासबुकची प्रत जोडावी लागणार् होती. अखेर काल शासनाच्या आदेश प्राप्त झाला असून रेशन कार्ड शोध मोहीमेला शासनाकडून स्थगिती देण्यात आली असल्याची माहीती तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिली आहे.