जळगाव-लाइव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील रेल्वे स्थानक परिसरात अज्ञात व्यक्तीकडून वाहनांची तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील रेल्वे स्थानक परिसरात कोणतरी अज्ञात व्यक्तीने दगडाच्या साह्याने वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडली. दरम्यान परिसरातील नागरिकांनी त्या व्यक्तीला अडविले असता त्याने त्यांच्या सोबत देखील हुज्जत घातली. या परिसरात रात्रीच्या वेळी तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळाताच शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परीस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान पोलिसांकडून त्या तोडफोड करणाऱ्या माथेफिरूचा शोध घेतला जात होता.