जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रेल्वे सवलत प्रक्रिया व दिव्यांग तपासणीसाठी आगाऊ कुपन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दररोज देण्यात येत असतात. तरी गरजूंनी शासकीय कामकाजाच्या कोणत्याही दिवशी कार्यालयीन वेळेत कुपन घेण्यासाठी यावं असे आवाहन रुग्णालयाच्या दिव्यांग बोर्डातर्फे करण्यात आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाविरहित आजारांवर उपचार सुरु झाले आहे. त्यासोबत दिव्यांग बांधवांच्या वैद्यकीय तपासणी दर बुधवारी सकाळी ९ वाजता सुरु होते. दिव्यांग बांधवांची गैरसोय थांबावी याकरिता आगाऊ बुकिंग कुपन प्रणाली सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार हे कुपन शासकीय कामकाजाच्या कोणत्याही दिवशी मिळत असून कार्यालयीन वेळेतच घ्यायला यावे असे आवाहन करण्यात आला आहे. तसेच, अनेक दिव्यांग बांधवाना रेल्वे सवलत प्रक्रिया करावयाची असते. त्याकरिता अनेक जण फक्त बुधवारीच येतात, असे निदर्शनास आले आहे. मात्र हि प्रक्रिया देखील सरकारी कामकाजाच्या कोणत्याही दिवशी केली जात आहे. त्याचाही दिव्यांग बांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.