रेल्वेसाठी धारावीत परप्रांतीय मजुरांची गर्दी; पोलिसांची कसरत

मुंबई वृत्तसंस्था । कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीतून गावाला जाण्यासाठी हजारो मजूर कुटुंबासह सामान घेऊन धारावीच्या रस्त्यावर आले आहेत. श्रमिक रेल्वेतून जाण्यासाठी हे मजूर स्टेशनपर्यंत जाणाऱ्या बसची सकाळपासून वाट आहेत. गर्दी होऊन फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे  पोलिसांनी तेथे येऊन मजुरांना रांगेत उभे केले.

गेल्या अडीच महिन्यांपासून असलेल्या टाळेबंदीमुळे परप्रांतीय धारावीत अडकलेले आहेत. हातावर पोट असणाऱ्या परप्रांतीयाकडचे पैसे आता संपले आहेत. त्यामुळे त्यांच्या खाण्या-पिण्याची गैरसोय होत आहे. त्यामुळे ते आपल्या गावी जाण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. रेल्वे मंत्रालयाने या मजुरांसाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. त्यांच्याकडील नोंदीनुसार मजुरांना रेल्वेतून मूळ राज्यात पाठविण्यात येत आहे. धारावीत हजारो कामगार अडकलेले आहेत.

बिहार व मध्य प्रदेश आदी राज्यांत आज श्रमिक रेल्वे जाणार आहेत. त्यामुळे धारावीतून दादर, मुंबई सेंट्रल, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वेस्थानकांवर जाण्यासाठी बस सोडण्यात आल्या आहेत. या बस आणि एसटीमध्ये बसून रेल्वेस्थानकात जाण्यासाठी मजुरांनी धारावीत गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.

Protected Content