रेमडेसिवीर आणि टॉसिलीझूमॅब इंजेक्शनचा काळा बाजार ; पाच जणांना अटक

ठाणे (वृत्तसंस्था) कोरोनावर प्रभावी मानले जाणारे रेमडेसिवीर आणि टॉसिलीझूमॅब इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. 3 हजाराचे इंजेक्शन २५ हजार रुपयांना तर अन्य एक इंजेक्शन तब्बल ८० हजार रुपये किमतीत ही टोळी विकत होती.

 

 

कोरोनाग्रस्त गंभीर रुग्णांसाठी रेमडेसिवीर आणि टॉसिलीझूमॅब ही दोन इंजेक्शन रक्षक ठरलेली आहेत. मात्र, त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजारात सुरु असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याच इंजेक्शनचा काळाबाजार करुन २५ हजार आणि ८० हजार रुपयांचे विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक करुन रॅकेट उध्वस्त केले आहे. त्यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात जीवांरक्षक औषधांचा काळाबाजार, अतिरिक्त पैसे घेणे प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content