जळगाव, प्रतिनिधी । रेडक्रॉस दिनानिमित्त महापौर व उपमहापौर यांनी रेडक्रॉस रक्त पेढीस भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
रेडक्रॉस दिवसानिमित्ताने महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी रेडक्रॉस रक्त पेढीस भेट देवून शुभेच्छा दिल्यात. यावेळी रेड क्रॉसच्या वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली. रेड क्रॉसच्या सामाजिक उपक्रमात असलेल्या सहभागाचे कौतुक करण्यात आले. याप्रसंगी व्हाईस प्रेसिडेंट ऑफ रेड क्रॉस गनी मेनन, सेक्रेटरी विनोद बियाणी आदींनी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांना रेड क्रॉस सोसायटीच्या अडचणी संदर्भात जाणीव करून दिली.
गनी मेनन यांनी रेडक्रॉसतर्फे भविष्यात आरोग्य विषयक विविध सुविधा देण्यात येणार आहेत. यात सुसज्ज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे व इतर सुविधा पुरविण्याच्या योजनेबाबत माहिती दिली. आरोग्य विषयक सर्व सुविधा एकाच छताखाली देण्याचा मानस त्यांनी व्यक्त करून त्यांना महापालिकेतर्फे जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली महापौर व उपमहापौर यांनी त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/884583658813337