जळगावात बेकायदेशीर देशी दारूची विक्री; एकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात बेकायदेशीर दारूची विक्री करणाऱ्या संशयित सुमारे ३२ हजार रूपयांची गावठी दारू सोडून पळ काढल्याची घटना बुधवारी रात्री केली. पोलीसांनी दारू जप्त केली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील सुप्रीम कॉलनी भागातील रामदेवबाबा मंदीराजवळ संशयित आरोपी आझाद बहादुर कंजर हा त्यांच्या घराच्या समोर बेकायदेशीर देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील, पोना नितीन पाटील, प्रदीप पाटील, महेंद्र गायकवाड हे बुधवारी ९ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास छापा टाकला. पोलीस येत असल्याची माहिती मिळताच संशयित आरोपी आझाद कंजर हा पळून गेला. यावेळी त्यांच्या ताब्यातील सुमारे ३२ हजार ४४८ रूपये किंमतीचे देशी टँगो पंच देशी दारूचे १३ खोके आढळून आले. सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संशयित आरोपी आझाद कंजर यांच्या विरोधात पो.कॉश. सतिष गर्जे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content