.
सावदा : प्रतिनिधी । संविधान दिनानिमित्त मागील वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा रिस्पेक्ट युथ फाउंडेशन तर्फे परिसरातील स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
इ- ५ वी ते इ- १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा लहान गट आणि त्यापुढील सर्व विद्यार्थ्यांचा मोठा गट असे दोन गट तयार करण्यात आले होते. लहान गटासाठी स्वतंत्र पेपर तर मोठ्या गटासाठी 4 सेट असलेली प्रश्नपत्रिका होती. परिक्षेमधे यावल,रावेर,भुसावळ , मुक्ताईनगर तालुक्यातील 58 गावांतील 513 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
आ.गं.हायस्कूल आणि कन्या शाळा सावदा या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. निकाल आणि बक्षिस वितरणाचा कार्यक्रम नालंदा बुद्ध विहार सावदा येथे मान्यवारांच्या हस्ते लहान आणि मोठ्या गटातील प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि प्रास्ताविकेची प्रत देवून झाला.
लहान गटातून प्रथम क्रमांक – स्वप्निल सपकाळे ( रा.भुसावळ , रोख रुपये ३१०० आणि प्रमाणपत्र), द्वितीय क्रमांक – रोहन तायडे ( रा.हिंगोणा , रोख रुपये २१०० आणि प्रमाणपत्र), तृतीय क्रमांक मोहित सोनवणे ( रा.बामणोद , रोख रुपये ११०० आणि प्रमाणपत्र) देण्यात आले .
मोठ्या गटातून प्रथम क्रमांक नीरज सपकाळे ( रा.कासवा , रोख रुपये ३५०० आणि प्रमाणपत्र), द्वितीय क्रमांक पराग जावळे (रा.सुनोदा , रोख रुपये २१०० आणि प्रमाणपत्र), तृतीय क्रमांक अमोल मेढे (रा.फैजपुर , रोख रुपये ११०० आणि प्रमाणपत्र) देण्यात आले . सर्व सहभागी विद्यार्थी यांना संविधानाच्या प्रास्ताविकेचे प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक समता मंच रावेर अध्यक्ष राजीव सवर्णे, सचिव नगिनदास इंगळे, संचालक योगेश गजरे, .राजकुमार लोखंडे, कार्याध्यक्ष उमेश गाढे, फुले-शाहू-आंबेडकर सार्वजानिक वाचनालय रावेरचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, फैजपुरचे नगरसेवक इरफ़ान मेंबर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रावेरचे संजय भालेराव, चिनावलचे तलाठी उमेश बाभुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.