जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महापौर जयश्री महाजन यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.
शहरात आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर रिक्षा युनियनच्या वतीने रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात स्टेट बँक चौक येथून करण्यात आली. या रॅलीचा रेल्वे स्टेशन, टॉवर चौक, चित्रा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गाने स्वातंत्र्य चौक या ठिकाणी समारोप करण्यात आला. रॅलीत रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे यांच्यासह रिक्षाचालक बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान,स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महापौर जयश्री महाजन यांनी अभिवादन केले. याप्रसंगी आयुक्त विद्या गायकवाड, शहर अभियंता विलास सोनवणी, सहाय्यक आयुक्त तथा नगर सचिव सुनील गोराणे, कार्यालय अधीक्षक अविनाश बाविस्कर, शाखा अभियंता योगेश वाणी, महापौरांचे सहाय्यक नितीन पटवे, हेडमाळी सुरेश कोल्हे, जितेंद्र धनगर, राजू कोळी आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3003036946660078