कोविडमुळे यंदा ४० टक्के ग्राहकांनी खरेदी केले ऑनलाईन धान्य – विजयकुमार वाणी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी धान्य व्यवसायात वृध्दी झाली आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात साधारणतः ग्राहक धान्य खरेदी करून वर्ष-दोन वर्षभरासाठी साठवण करून ठेवत असतो, ते अधिक काळ टिकावे यासाठी ग्राहकांनी कोरडे धान्य खरेदी करणे अपेक्षित आहे. तसेच रूढी- परंपरेनुसार किटकनाशक इंजेक्शन, निंबाचा पाला, मिरची व पारा टाकण्याची पद्धत आहे असे प्रसिद्ध धान्यव्यापारी विजयकुमार रामदास ॲण्ड कंपनीचे विजयकुमार वाणी यांनी सांगितले.

कोविडमुळे यंदा ४० टक्के ग्राहकांनी ऑनलाईन धान्य खरेदीवर भर दिल्याचेही त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. जळगावचा ग्राहक हा अत्यंत चोखंदळ आहे. जळगावचे प्रखर तापमान पाहता धान्यही खरेदीनंतर सुकवले जाते, तशी सवयही ग्राहकांना आहे. जळगाव येथील धान्य बाजारात, पंजाब, हरियाणा आणि मध्यप्रदेश आदी भागातून चांगल्या गुणवत्तेचा गहू, तांदूळ आणि विविध प्रकारच्या डाळी उपलब्ध आहेत. जळगाव हे सोन्यासाठी जसे देशात प्रसिध्द आहे तसेच धान्याचे आगार म्हणूनही लौकिक आहे, असे श्री.वाणी म्हणाले. ग्राहकांनी ध्यान्याची कशाप्रकारे काळजी घ्यावी, याबद्दल अत्यंत उपयुक्त माहितीही त्यांनी सांगितली.

 

 

Protected Content