जळगाव प्रतिनिधी । रिक्षा घेण्यासाठी माहेरहून एक लाख रूपये आणावे छळ करणाऱ्या निमखेडी येथील पतीसह सासरकडील सात जणांविरूध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील द्रौपती नगरात राहणाऱ्या विवाहिता रेणुका रमाकांत सपकाळे यांचा विवाह जळगाव तालुक्यातील निमखेडी येथील रमाकांत शिवाजी सपकाळे यांच्याशी १५ जुलै २०१८ रोजी झाला. लग्नानंतर दोन महिन्यानंतर पतीसाठी रिक्षा घ्यायची आहे यासाठी माहेरहून १ लाख रूपये आणावे या कारणावरून पती रमाकांत सपकाळे, सासू रत्ना शिवाजी सपकाळे, सासरे शिवाजी उखा सपकाळे, जेठ रविंद्र शिवाजी सपकाळे, जेठाणी वंदना रविंद्र सपकाळे, नणंद संगीता कोळी आणि मावस सासू उज्वला रमेश साळुंखे सर्व रा. निमखेडी यांनी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. शारिरीक व मानसिक छळ सहन न झाल्याने विवाहिता जळगाव येथील माहेरी निघून आल्यात. विवाहितेच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि मगन मराठे करीत आहे.