पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बंजारा ब्रेगेड चे गुजरात राज्य संघटक राहुल राठोड यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्या बद्दल “राष्ट्रभक्ति महाराष्ट्र गौरव पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.
राष्ट्रभक्ती जनविकास संघटना आयोजित स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा पुरस्कार १२ फेब्रुवारी २०२३ रोजी डॉ. नितु मांडके, आयएमए हाऊस, शुक्रवार पेठ, क्षत्रिय कार्यालय शेजारी, टिळक रोड, पुणे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी, प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष बच्चु कडू, विभागीय सहनिबंधक लातूर डॉ. ज्योती मेटे, पद्यश्री सरपंच डॉ. पोपटराव पवार, महाराष्ट्र केसरी विजेते ए. सी. पी. विजय चौधरी, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे, सामर्थ्य जनशक्ती संघटना अध्यक्ष जगन्नाथ माने, सहा. संचालक पुरातत्व विभाग डॉ. विलास वाहणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. राहुल राठोड यांनी या अगोदर राष्ट्रीय बंजारा परिषद च्या गुजरात राज्य संघटकपदी आपली सेवा बजावली आहे. तसेच अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन च्या धुळे जिल्हा संघटक या पदावर राहुन फार्मासिस्टसाठी ही कार्य केले आहे.