Home राजकीय राहुल गांधी यांनी करोनाची चाचणी केली का ? ; भाजप नेत्याची टीका

राहुल गांधी यांनी करोनाची चाचणी केली का ? ; भाजप नेत्याची टीका


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इटलीवरुन परतल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी करोनाची चाचणी केली का ? हे सांगावे. राहुल गांधी यांनी भारतात परतल्यानंतर सर्वात आधी आपली तपासणी करुन घ्यायला हवी होती, अशी टीका भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी केली आहे.

 

राहुल गांधी यांनी बुधवारी दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केला. यावरून संसद परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना रमेश बिधुरी यांनी म्हटले की, राहुल गांधी नुकतेच इटलीवरुन परतले आहेत. विमानतळावर त्यांची तपासणी झाली की नाही मला माहित नाही. करोना व्हायरस संसर्गजन्य रोग आहे. लोकांमध्ये जाण्याआधी त्यांनी आपण करोना व्हायरसची चाचणी केली की नाही?, हे सांगायला हवे. लोकांच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक आहे.


Protected Content

Play sound