जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालयाच्या एन.सी. सी. युनिट, १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअन, एच.डी.एफ.सी. बँक लिमिटेड, सिव्हील ब्लड बँक आणि महाविद्यालयाचे एन.एस.एस. युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय छात्र दिनानिमित्त नुकतेच छात्र सैनिकाद्वारे रक्तदान शिबीर झाले.
या रक्तदान शिबिरास १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअन, जळगाव यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एन. भारंबे, कलाशाखा समन्वयक प्रोफेसर बी.एन. केसुर, एन.सी.सी. अधिकारी लेफ्ट. (डॉ.) योगेश बोरसे, एन.एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. दिलवरसिंग वसावे, सी.टी.ओ. प्रा. गोविंद पवार. प्रा. प्रतिभा तिवारी, प्रा. विजय लोहार, बटालिअन चे सुभादार मेजर प्रेम सिंग, हवलदार अरुण कुमार, एच डी एफ सी बँकेचे मनेजर तुषार वाडोडकर, सिव्हील ब्लड बँकेचे डॉ. आकाश चौधरी, डॉक्टर दीपक पाटील, तांत्रिक निरीक्षक लक्ष्मीकांत त्रिपाठी. एन.एम. महाविद्यालयाचे लेफ्ट. शिवराज पाटील आदी उपस्थित होते.
या शिबिरात ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे छात्र सैनिक, एन.एस.एस. चे स्वयंसेवक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठे योगदान दिलेत. एच.डी.एफ.सी बँकेच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास प्रोत्साहन पर भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच प्राचार्य संजय भारंबे यांनी रक्तदात्यांची चे या सामाजिक कार्याबद्दल प्रमाणपत्र देऊन विशेष आभार मानलेत. लेफ्ट. (डॉ.) योगेश बोरसे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.