धरणगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय क्षत्रिय महासेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी धरणगाव येथील विनोदसिंह रमनसिंह बयस यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय क्षत्रिय महासेनेच्या जिल्हा अध्यक्षपदी विनोद बयस यांची निवड झाल्याने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांचे राजपूत समाजातील नगरसेवक कडुआप्पा बयस, योगेश चौहान, प्रथम सुर्यवंशी, रणजितसिंग राजपुत , हर्षल चौहान, गौरव चौहान, कुंदन बयस, धनंजय बडगुजर, आदी समाज बांधवांनी अभिनंदन केले.