Home Cities जळगाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.

 

यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, भुसावळचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार (महसूल) पंकज लोखंडे. तहसीलदार (संगायो) जितेंद्र कुवर, अव्वल कारकून गणेश साळी, राजेंद्र पाटील यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound