जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जोडे मारो आंदोलन व पडळकर यांच्या पुतळ्याचे दहन करून जाहीर निषेध करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात केलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केले. यावेळी आमदार पडळकर व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी सोबत आणलेल्या बॅनरवरील आमदार गोपीचंद पडळकर व देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला जोडे मारून त्यांचा निषेध नोंदविला. तसेच आ. पडळकर यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी स्वप्निल नेमाडे, मजहर पठाण, अॅड. कुणाल पवार, राजेश पाटील, अक्षय वंजारी, सुशील शिंदे, डॉ. रिजवान खाटीक, नितीन जाधव, हर्षवर्धन खैरनार, सकील शेख, अनिरुद्ध जाधव, किशोर सुर्यवंशी, पंकज वाघ, दर्शन चौधरी, राजू मोरे, जयश्री पाटील यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्रात फिरणे मुष्कील करू – अभिषेक पाटील
यावेळी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील म्हणाले, गोपिचंद पडळकर यांची शरद पवार यांच्या समोर सावलीची देखील लायकी नाही. त्यांची लायकी बरमातीकरांनी मागील विधानसभा निवडणुकीत दाखऊ दिले आहे. राजकारणात मोठे होण्यासाठी शरद पवार यांच्या विरोधात बोलण्याचा ट्रेंड् आला आहे. देवेंद्र फडणवीस व गोपीचंद पडळकर यांनी यापुढे शरद पवार किंवा राष्ट्रवादी विरोधात अपशब्द बोलला तर महाराष्ट्रात फिरणे मुष्किल करून टाकू असा इशारा अभिषेक पाटील यांनी दिला.
दरम्यान, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने आंदोलनानंतर सर्व आंदोलोकांना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी अकबर पटेल व त्यांचा पथकाने अटक करून त्यांची सुटका केली.
लिंक :
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/281202116325959/
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/575593183143484/