फैजपुर, प्रतिनिधी । येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा कार्यकर्ते विनोद कोल्हे यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवक फैजपुर शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
विनोद कोल्हे यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवक फैजपुर शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील, जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसे, मा.आ.मनीष जैन, युवक जिल्हा अध्यक्ष रविंद्र नाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मुकेश येवले, युवक तालुका अध्यक्ष देवकांत पाटील, फैजपुर राष्ट्रवादी शहरअध्यक्ष अनवर खाटीक यांनी अभिनंदन केले.