राष्ट्रवादी काँग्रेसच्या महा रक्तदान शिबिरास प्रतिसाद ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पुढाकाराने जिल्हा कार्यालयात आज महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने महा रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा राष्ट्रवादी, गुलाबराव देवकर फाऊंडेशन आणि मजूर फेडरेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्रभैय्या पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलीक, युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, नामदेवराव चौधरी, मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ, राजेश पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर म्हणाले की, सध्या कोरोनाच्या आपत्तीमुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. नेमकी ही समस्या लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आला असून याला उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या कार्यक्रमातून संकलीत करण्यात आलेले रक्त सिव्हील हॉस्पीटलमधील रूग्णांसाठी उपयोगात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

खालील व्हिडीओत पहा राष्ट्रवादीच्या महा रक्तदान शिबिराबाबतचा वृत्तांत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/571828897079533

Protected Content