वरणगाव, प्रतिनिधी । आज मुंबई येथुन पायी चालत छत्तीसगढ येथे जाणाऱ्या २६ मजुरांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरणगावतर्फे मोफत बस व्यवस्था करून त्यांना घरी पोचवण्यासाठी सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या करून व जेवण तसेच सर्व जीवनावश्यक वस्तू पुरवून पाठवण्यात आले.
मुंबई येथून पायीच चालत छत्तीसगड येथे निघालेल्या २६ मजुरांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरणगावतर्फे मोफत बसची व्यवस्था करण्यात आली. बसची व्यवस्था झाल्याने अतिशय भावुक झालेल्या मजुरांच्या चेहऱ्यावरील समाधान त्यांचा आनंद खूप काही सांगत होता. वरणगाव येथुन बाहेरगावी जाण्यासाठी आवश्यक असलेल्या इ पास बनवण्यासाठी शहरातील अनेक नागरिकांना ग्रामीण रुग्णालयात मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत होती. हीबाब लक्षात येताच तालुका अध्यक्ष दिपक मराठे, शहरअध्यक्ष संतोष माळी, सामाजिक कार्यकर्त्या सविताताई माळी यांनी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरून नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीवर मार्ग काढला व शासनादेशाचे पालन करण्याची समज दिली. गटनेते राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांनी छत्तीसगडसाठी जाणाऱ्या बसला हिरवा झेंडा दाखवुन रवाना केलं. याप्रसंगी तालुका अध्यक्ष दिपक हरी मराठे, शहर अध्यक्ष संतोष माळी, सामाजिक कार्यकर्त्या सविताताई माळी, नगरसेवक विष्णु नेमीचंद खोले, रविंद्र शांताराम सोनवणे, गणेश सुपडू चौधरी, समाधान जगदेव चौधरी, साजिद कुरेशी, तालुका सरचिटणीस राजेश पंडित चौधरी, ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश वसंत नारखेडे, युवक शहर अध्यक्ष प्रशांत मोरे, धीरज माळी आदी उपस्थित होते.