राष्ट्रवादीतर्फे कुंभारखेडा -चिनावल रस्त्यांसाठी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

 

सावदा ता.रावेर, प्रतिनिधी । लोहारा, गौरखेडा, कुंभारखेडा, वाघोदा गावांना सावदा येथे जाण्यासाठी सोयीचा असलेल्या कुंभार खेडा ते चिनावल रस्ता तीन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला आहे. त्याच्या प्रत्यक्ष डांबरीकरणाच्या कामास सुरुवात न झाल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली असून अपघात होवून जीवितहानी झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा रावेर तालुका राष्ट्रवादी कार्याध्यक्ष विलास ताठे यांनी दिला आहे.

तीन वर्षांपूर्वी कुंभार खेडा ते चिनावल रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मंजूर झाला आहे, मात्र हे डांबरीकरण दोन ठेकेदारांना दिलेले असल्याने मंजुरीनंतर वर्षे उलटून देखील कामाला सुरुवात झालेली नव्हती. याबाबत विलास ताठे यांनी वारंवार पाठपुरावा करून प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे याकडे लक्ष वेधले असता
कामाला सुरुवात करण्यात आली.  मात्र रस्त्यांच्या कामाला सुरुवात होऊन जवळपास आठ महिन्याचा कालावधी लोटून देखील आजपावेतो फक्त खड्डे भरण्यात आले असून दुतर्फा जाडी भरडी खडीचे ढिग दिखावासाठीच तर टाकण्यात आहेत. हे काम पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे या रस्त्यात एखादे वाहन पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच हा रस्ता पावसाळ्याच्या अगोदर होणे अपेक्षित असताना मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने व ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे सदर रस्त्याचे काम बंद असल्याने हा रस्ता पावसाळ्याच्या आधी होईल का? असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. तरी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष पुरवून त्वरित रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी परिसरातील वाहनधारकांनामधून होत आहे.  यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग सावदा व सदर ठेकेदार प्रती मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे, तरीही त्यांनी तातडीने ह्या रस्त्यांची दुरवस्थेची दखल न घेतल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याची व अपघात झाला आणि यांत बरेवाईट झाल्यास कोणाचीही जीवितहानी वा मालाचे नुकसान झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल असा इशारा विलास ताठे यांनी उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग सावदा बावस्कर यांना प्रत्यक्ष रस्ता पाहाणी दरम्यान दिला.

 

Protected Content