राष्ट्रवादीतर्फे उपमुख्यमंत्री पवार यांच्या आप्तांवरील कारवाईचा निषेध (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी  | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आप्तांवर प्राप्तीकर खात्यातर्फे करण्यात येणारी कारवाई ही आकसापोटी करण्यात येत असल्याचा आरोप करून आज महिला आणि युवती राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी आम्ही देखील अजितदादा पवार यांच्या भगिनी असून आमच्यावरही इन्कमटॅक्सने धाडी टाकाव्या असे आव्हान आंदोलकांनी करत आयकर खात्याच्या कार्यालयावर धडक दिली आहे.

 

यावेळी दोन दिवसांपुर्वी महाराष्ट्राचे मा.उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्यासह त्यांच्या बहीणींच्या कार्यालयांवरही आयकर विभागाने धाडी टाकल्या. मा. अजितदादांच्या व त्यांच्या मालमत्तांची चौकशी होणे आम्ही समजु शकतो , त्यातुन सत्य काय ते बाहेर येईलच परंतु कुटुंब म्हणुन त्यांच्या बहीणींना त्रास देण हा राजकीय हतबलतेचाच एक भाग आहे.हे सुडाच राजकारण नैतिकतेला व वैचारीकतेला धरुन नाही.अजितदादांच्या कुटुंबावर या धाडी टाकुन आयकर विभाग भाजपच्या दबावाला बळी पडतो आहे असेच यातुन दिसते. म्हणुन आज आम्ही याचा निषेध करतो आणि त्या जशा अजित दादांच्या बहीणी आहेत तसेच राष्ट्रवादी हे सुध्दा एक कुटुंब आहे आणि आम्हीही त्या कुटुंबातल्या बहीणी आहोत म्हणुन आमची विनंती आहे की आयकर विभागाने आमच्यावरही धाडी टाकाव्यात अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी  राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्पीता पाटील, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, राष्ट्रवादी अर्बन सेल जिल्हाध्यक्ष आश्विनी  देशमुख,   युवती जिल्हाध्यक्ष कल्याणी राजपुत, युवती सरचिटणीस स्नेहल शिरसाठ, सामाजिक न्याय विभाग संचिक प्रतिमा  शिरसाठ, मुविकोराज कोल्हे, जुबेर खाटिक, प्रवीण महाजन आदी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/272324748123627

 

Protected Content