राष्ट्रपुरुषांबद्दल सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट ; एका विरुद्ध गुन्हा दाखल

 

पाचोरा, प्रतिनिधी । शहरातील एका तरूणाने धार्मिक भावना भडकवण्याच्या उद्देशाने सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी पाचोरा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ सदर तरूणास अटक केली. या प्रकरणी त्या तरूणाविरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असुन त्या तरूणास आज जळगाव न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली असुन या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकाडे हे करित आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील जनता वसाहतमधील रहिवासी आकाश आनंदा नन्नवरे (वय २०) या युवकाच्या मोबाईल क्रमांक ८३२९५४९७६५ यावर दि. ११ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजुन १५ मिनिटांनी फेसबुक या सोशल मिडिया वर सचिन पाटील रा. कोंडवाडा गल्ली ह. मु. प्रेमनगर कृष्णापुरी याने राष्ट्रपुरुषा विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याने समाजातील धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची माहीती प्राप्त झाली. याबाबत आकाश आनंदा नन्नवरे यांच्या फिर्यादीवरून सचिन पाटील याचे विरोधात पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सचिन पाटील नामक विकृत मानसिक तरुणाने महामानव राष्टपुरूषां यांचे विषयी तसेच भारतीय राज्य घटनेविषयी अत्यंत खालच्या भाषेत फेसबुक पेजवर शेरेबाजी केली होती. त्यानंतर समस्त आंबेडकर प्रेमी तरुणांनी पाचोरा पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या मांडून गुन्हा दाखल करावा व आरोपीस अटक करावे अशी मागणी लावून धरली होती. घटनेचे गांभीर्या ओळखत पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, गणेश चौबे, पोलिस कर्मचारी किरण पाटील, राहुल सोनवणे आदी कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल करून घेत आरोपीस अटक केली आहे. आज जळगाव न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Protected Content