एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्य भारताच्या इतिहासात प्रथमच द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने एक आदिवासी महिलेला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल येथील म्हसावद नाका परिसरात जल्लोष करण्यात आला.
याप्रसंगी आनंद दाभाडे, जयश्री पाटील, अमोल जाधव, डॉ. नरेंद्र पाटील, रवींद्र महाजन, जगदीश ठाकुर, सुनील चौधरी, जहीरुद्दीन शेख कासम प्रशांत महाजन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.