रावेर प्रतिनिधी । राष्ट्रवादी पक्ष सत्तेत असून संधीचे सोनं करा पक्षाचे जास्तीत जास्त कामे करून पक्षाचे विचार तळागळापर्यंत पोहचवा पुढील चार महिन्यांमध्ये निवडणुका असून पक्ष वाढीसाठी सर्वांनी कामाला लागा असे आवाहन माजी आमदार अरुणदादा पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना आज झालेल्या बैठकीत केले.
आगामी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या येणाऱ्या वाढदिवसा निमित्त तसेच आगामी निवडणुकांसंदर्भात रावेर कृषी उपन्न बाजार समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, राष्ट्रवादी जिल्हा महीलाध्यक्ष कल्पनाताई पाटील, राष्ट्रवादी जिल्हाउपाध्यक्ष रमेश महाजन, माजी जि.प. सदस्य रमेश पाटील, राष्ट्रवादी सेवा दलचे प्रकाश पाटील, मीनाक्षी चव्हाण, तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, शहराध्यक्ष महेमुद शेख, महिला तालुकाध्यक्ष माया बाऱ्हाटे, नगरसेवक राजेश वानखेडे, आर.के. चौधरी, युवक शहराध्यक्ष प्रणित महाजन, खरेदी विक्री संघ व्हा. चेअरमन किशोर पाटील, विनोद पाटील, अशोक पाटील, प्रल्हाद बोंडे, बबलु सावंत, विलास ताठे, मधुकर पाटील, किरण पाटील आदी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.