रावेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | फुले,शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व समस्त बौध्द समाज रावेर तालुका यांचे विद्यमाने बौध्द समाजाचा सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी बौध्द समाजातील पालकांनी आपल्या पाल्याची नोंदणी करून घ्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रविवार दि.८ मे रोजी सरदार जी.जी. हायस्कुल व ज्युनियर कॉलेज रावेर येथे बौध्द समाजाचा १० वा सामुहिक विवाह सोहळा फुले,शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय संस्थे मार्फत चौथा सामुहिक विवाह सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या विवाह सोहळयासाठी बौध्द उपासक व उपाससिका यांनी जास्ती जास्त संख्येने नोंदणी करुन सहकार्य करावे. सामुहिक विवाह करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे वेळ,पैसा, श्रम वाचतात व समाजाचा एकोपा निर्माण होऊन सामाजिक विकासाला हातभार लागतो. विवाह नोंदणी करीता संपर्क सामुहिक विवाह सोहळा समिती अध्यक्ष राजेंद्र अटकाळे रावेर मो.नं.९७६४४९३५४५, ७७२१९३४३५८,ऑफिस फोन नं. ०२५८४ २९५०६२ ,केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे .७८७५५३३०६०, केंद्रीय शिक्षक विजय अवसरमल मो. ९९७०६ ०५८३४ , भा.बौ.म.स.ता.अध्यक्ष अनोमदर्शी तायडे सर सावदा मो.९८२३६६३१८५, जळगाव जामोद :– पत्रकार उत्तम वानखेडे मो.९८८१६१०३८५,मलकापुर :- सतीष दांडगे मो.९०४९७९२७१२,यांच्याशी संपर्क साधावा जास्तीत जास्ती संख्येने नोंदणी केलेल्या उपवर वधु वरांसाठी,विशेष समाजकल्याण विभागामार्फत कन्यादान योजनेतुन २०,०००, (वीस हजार) रुपये अनुदान मिळणार आहे. याची नोंद घ्यावी त्यासाठी वधु-वराचे शाळासोडल्याचे दाखले,जातीचे दाखले ,अधिवास दाखले,आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो व विवाह झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत विवाह नोंदणी दाखला आणणे बंधनकारक राहील. तरी बौध्द समाजातील पालकांनी आपल्या पाल्यांची नावे जास्तीत जास्त संख्येने नोंदणी फुले,शाहु,आंबेडकर सार्वजनिक वाचनालय तहसिल कार्यलया समोर रावेर येथे करुन सामुहिक विवाह सोहळा समितीस सहकार्य करावे असे आवाहन समितीतर्फे करण्यात येत आहे.