रावेर प्रतिनिधी । प्रजासत्ताक दिना निमित्त विविध ठिकाणी आज ध्वजारोहण करण्यात आले सुरुवातीला तहसिल कार्यालयात तहसिलदार सजंय तायडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
रावेर तालुक्यात प्रजासत्ताक दिना निमित्त विविध ठिकाणी आज ध्वजारोहण करण्यात आले. रावेर पोलिस स्टेशन येथे पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांनी ध्वजारोहण केले. तर पंचायत समितीमध्ये सभापती जितेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
नगर पालिकेत दारा मोहम्मद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच येथील सरदार जी. जी. हायस्कूलच्या ग्राउंडवर प्रशासकीय कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कोरोना काळात चांगले काम करणा-यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.