रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अग्रसेन भवनात तालुक्यातील धनगर समाजाचा मेळावा उत्साहात पार पडला. याप्रसंगी धनगर समाजाचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यकमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लखन सावळे यांनी केले, तसेच आपले मनोगत डॉ. भगवान कुयटे, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, समाजाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावळे, उत्तर महाराष्ट्र संघर्ष समिती प्रमुख रामेश्वर पाटील, किसान सेलचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख सुरेश धनके यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषण डॉ. विकास महात्मे यांनी केले. त्यांनी मार्गदर्शन करताना ६ नोव्हेंबर २०२२ रोजी संभाजीनगर येथे असलेल्या जन आक्रोश आंदोलनाला आपली उपस्थिती पाहिजे व उपस्थितीचे महत्त्व सांगितले.
सूत्रसंचालन प्निल आसुरकर यांनी केले व आभार प्रदर्शन रोहित बावस्कर यांनी मानले. कार्यक्रमाला स्वप्निल सोनवणे, जयेश कुठे, शुभम, राजन लासुरकर, दिलीप सोनवणे, राजू पाचपोळ, रमेश सावळे गणेश, यासह तालुक्यातील असंख्य धनगर समाज बांधव हजर होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज पथकातील मुलींच्या लेझीम मंडळ पथक केऱ्हाळे यांनी स्वागत करताना लेझीम खेडून स्वागत केले. रावेर येथील पत्रकार वैद सर, प्रवीण पाटील, चंद्रकांत विचवे, दीपक नगरे, दिलीप कांबळे, सी एस पाटील यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.