रावेर, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, रावेरच्या वतीने रक्तदानशिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष महेमुद शेख, युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, अल्पसंख्यक तालुका अध्य्क्ष इमरान पहलवान, युवक शहराध्यक्ष प्रणीत महाजन यांच्या सहकार्याने कोरोना महामारीत रक्ताचा उद्भवलेला तुटवडा आणि रुग्णाचे होणारे हाल लक्षात घेत राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ८३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. माजी आमदार अरुण पाटील, माजी जि. प. सदस्य रमेश पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रस जळगाव किसान जिल्हा अध्यक्ष सोपान पाटील, सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जळगाव जिल्हाकार्याध्यक्ष दिपक पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस रावेर तालुकाध्यक्ष सचिन पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रणित महाजन, प्र. स. सदस्य प्रकाश पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन (गोटु शेठ), प. स.सदस्य योगेश पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पदवीधर तालुकाध्यक्ष किरण पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस रावेर वि. कॉंग्रेस तालुकाध्यक्ष साईराज वानखेडे, वि.कॉ. शहराध्यक्ष गौरव महाजन, राष्ट्रवादी कॉंग्रेस विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, गोपाळ पाटील, राजेंद्र चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेस सचिव वाय. डी. पाटील, इरफान मेंबर, तसेच गोळवलकर रक्तपेढीचे पिआरओ अर्जुन राठोड, जितेंद्र शाह, जागृती लोहार व डॉक्टर तथा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. याप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.