
रावेर प्रतिनिधी । येथील नाईक महाविद्यालयात एचडीएफसी बँक आणि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी यांच्या मदतीने शिबिर घेण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर पी.व्ही. दलाल यांच्याहस्ते करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉ.जी.आर. ढेंबरे यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगून दर ४ महिन्यांनी नियमितपणे रक्तदान करण्याचे आव्हान केले. सर्व दानात रक्तदान हे महत्त्वपूर्ण महादान आहे. रक्तातील विविध घटकांमुळे अनेक जणांचे प्राण वाचवता येतात. जेव्हा जेव्हा रक्ताची गरज भासेल तेव्हा तेव्हा युवकांनी स्वेच्छेने रक्तदान करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. पी.व्ही. दलाल यांनी केले.
या रक्तदान शिबिरात ५२ युवक-युवतींनी रक्तदान केले. याप्रसंगी एचडीएफसी बँकेचे शाखा व्यवस्थापक मुकुंदा तावडे, गणेश पाटील, ललित चौधरी, राहुल तेली, शिवम महाजन, नारायण पाटील, अमोल पाटील, चेतन सोनवणे यांचे सहकार्य लाभले. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी जळगाव यांचे डॉ.सुधीर गजऋषी यांनी सहकार्य केले. महाविद्यालयाचे प्रा.एस.डी. धापसे, डॉ.बी.जी. मुख्यदल, प्रा.एस.बी. धनले, प्रा.एन.ए. घुले, प्रा.एस.बी. गव्हाड, प्रा. उमेश पाटील, प्रा.सी.पी. गाढे, प्रा.एम.डी. तायडे, प्रा. गोविंद सावळे यांनी परिश्रम घेतले.