रावेर प्रतिनिधी । आमदार शिरिषदादा चौधरी यांनी घेतलेल्या जनता दरबारामध्ये आलेल्या नागरीकांनी आरोग्य, एसटी महामंडळ, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम तसेच जलसंधारणसह इतर विभागाच्या संदर्भात नागरीकांनी प्रश्रांची सरबती केली.
नागरीकांच्या समस्यांचे उत्तरे देतांना प्रशासनाची चांगलीच दमछाक हा जनता दरबार सुमारे ५ तास चालला. यामध्ये अनेकांची प्रश्न मार्गी लागल्याने जनता व आमदारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. रावेर तहसिल कार्यालयात आज तालुक्यातील नागरीकांच्या समस्या सूटाव्या म्हणून जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी रावेर तालुक्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख या दरबाराला उपस्थित होते. यावेळी नागरीकांनी एक-एक करून आमदार शिरिषदादा चौधरी यांच्याकडे समस्या मांडल्या तर आमदारांनी जनते कडून उपस्थित झालेल्या प्रश्नाला अधिकारी यांनी उत्तरे दिली या संपूर्ण जनता दरबारात कोणताही गोंधळ झाला नाही सर्वांना उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तरे मिळाली
यावेळी व्यासपिठावर नगराध्यक्ष दारा मोहोम्मद, राजीव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, यशवंत धनके, आसिफ मोहोम्मद, योगराज पाटील, प्रकाश पाटील, हरीष गनवाणी, राजू सवर्णे, प्रतिभा बोरवले, दिपक पाटील, योगेश गजरे, सुरेश पाटील, सोपान पाटील आदी उपस्थित होते.