रावेर भाजपतर्फे केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव

रावेर प्रतिनिधी । केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या हिताचे कृषी विषयक दोन विधायक मंजूर केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्या अभिनंदनाचा ठराव तालुका भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आला असून याबाबतचे निवेदन प्रभारी तहसीलदार संजय तायडे देण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, कृषी विधेयके नुकतीच संमत करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर व राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी कृषी विषयक विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडल्यावर आवाजी मतदानाने मंजुर करण्यात आले आहे. हा शेतकर्‍यांच्या जीवनातील ऐतिहासिक निर्णय असून शेतकरी बंधनमुक्त झालेला आहे यामुळे केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव करून प्रभारी तहसीलदारांना देण्यात आला आहे.

या विधेयकामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच शेतकर्‍यांना संरक्षण व त्यांच्यापर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहचवण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांना दिलेल्या अभिनंदन ठरावात म्हटले आहे.

यावेळी भाजपच्या किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, पंचायत समिती सभापती जितेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस सी.ए स.पाटील, महेश चौधरी, माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य योगिता वानखेडे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रेखा बोंडे, शहराध्यक्ष दिलीप पाटील,नितीन पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content