रावेर बाजार समितीत आजपासून कापुस खरेदीच्या नाव नोंदणीला सुरुवात

 

रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील शेतक-यांसाठी रावेर बाजार समितीतुन सुखद बातमी आली आहे. आजपासुन अधिकृत नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे.

रावेर कापुस खरेदी केंद्र सुरु होईल की नाही याबाबत रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता.यासाठी काही दिवसांपूर्वी बाजार समिती सभपती श्रीकांत महाजन, निळकंठ चौधरी, डॉ. राजेंद्र पाटील, सचिव गोपाळ महाजन हे औरंगाबाद गेले होते. सीसीआय यांच्या प्रबंधक यांना भेटून शेतक-यांचा कापुस खरेदी करण्याची विनंती केली होती. अखेर आजपासून नाव नोंदणीला सुरुवात झाली असून रावत तालुक्यातील ज्या शेतक-यांना आपली कपाशी सीसीआयला विक्री करायची आहे त्यांनी बाजार समितीमध्ये आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स व सात बारा उतारा घेऊन नाव नोंदणी करावी यासाठी ५ हजार आठशे रुपये भाव निश्चित करण्यात आला असून हेक्टरी ४० क्विटल खरेदी करण्यात येणार आहे.

Protected Content