रावेर पोलिसांच्या गावठी हातभट्ट्यांवर ३ दिवसात २१ धाडी !

 

रावेर, प्रतिनिधी । शहरासह तालुक्यात  रावेर पोलिसांनी अवैध दारू विक्रेते, वाहतूक करणारे दारूभट्टीवाले यांच्यावर   ४ ते ६ मेदरम्यान २१ छापे टाकून ५० हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार रावेर पोलिसांनी  शहर व तालुक्यातील अवैध दारू विक्रेते, दारूभट्टीवर कारवाई करत २१ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अखिल तडवी ( रा. खिरोदा प्र ).,  सुभाष  सोनवणे  (रा. रावेर ), जगदीश   पाटील (रा. वाघोड) , निलेश  महाजन (रा. भगवती नगर रावेर) , जावेद  तडवी ( रा सहस्त्रलिंग ), अस्लम  तडवी ( रा. मोरवाल) , राजू  तडवी , अयुब  तडवी (रा. कुसुम्बा खु ) , श्रीराम  बारेला (रा. निमडया) , ललिता   राठोड ( रा. पाल ),  रेहान तडवी (रा. भोकरी) , ईश्वर   गाढे (रा. अहिरवाडी) , दिपक  महाजन ( रा.  जुना सावदा रोड रावेर) , शरीफ  तडवी ( रा. मुंजलवाडी), राहुल  सूरदास  (रा. मुंजलवाडी) , रुमसिंग   बारेला ( रा. गारखेडा) , पिंटू  तडवी ( रा. मोरवाल) , रघुनाथ  धनगर  ( रा. मुंजलवाडी) , फकिरा  तायडे ( रा. नेहता) , मनोज  तायडे  (रा. अहिरवाडी) , रघुनाथ   तायडे  (रा. अहिरवाडी)  यांच्याकडून   एकूण ५० हजार ८८०/-रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

या सर्व २१  आरोपीवर गुन्हे दाखल करून पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली एपीआय शितलकुमार नाईक व पोलीस स्टाफने ही  कारवाई केली. रावेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईने अवैध दारू काढणारे, विकणारांचे धाबे दणाणून गेले आहेत.

Protected Content