रावेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |रावेर शहरा नजिक अज्ञात वाहनाने मोटरसायकस्वाराला धडक दिल्याने मोटरसायकस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे.
बुरहानपुर-अंकलेश्वर महामार्गावर रावेर शहरा नजिक बिजासनी माता मंदिरा जवळ शेख अलताप शेख इकबाल (वय ३५ रा. इस्लामपुर सावदा ) हा स्वतःच्या मोटरसायकलने रावेरकडून सावदाकडे जात असतांना कोणत्या तरी अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन निघुन गेल्याचे वृत्त आहे. या झालेल्या अपघातात शेख अलताप शेख इकबाल याच्या मांडीला गंभीर दुखापत झाली व रक्तस्रावपण झाला. तसेच जखमी अवस्थेत अलताप महामार्गावर पडलेला असतांना सामाजिक कार्यकर्ते शरद राजपूत यांनी त्याला रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारर्थ दाखल केले. यावेळी मदतीला कॉग्रेस शहर उपाध्यक्ष संतोष पाटील देखिल धावून आले होते.