रावेर दंगल प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल

रावेर प्रतिनिधी । येथे काल रात्री उसळलेल्या दंगल प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून आज दिवसभरात कोणताही गैरप्रकार घडला नाही.

रावेर येथे रविवार रोजी झालेल्या जातीय दंगली तीन जण जखमी झाले असून एका जणाचा मृत्यू झाला आहे तर शहरात आता तणावपूर्ण शांतता असून आज दिवसभर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहे रावेर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोतवाल वाडा , संभाजी चौक ,मन्यार वाडा, बारी वाडा या परिसरात दोन गटात दंगल होवून जाळपोळ, तोडफोड करण्यात येवून नुकसान करण्यात आले.दोन गटात झालेल्या दंगलीत रसलपुर येथील जावेद सलीम ( वय २५ ) डिगंबर अस्वार ( वय ५५ ) भगवान जगताप (वय २७ )हे दोघ गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. यात जमावाने एक टाटा मॅजिक, तीन मोटार सायकल जाळण्यात आल्या असुन तोडफोड व नुकसान केले आहे. जाळपोळ झाल्याने आग विझविण्यासाठी सावदा, फैजपुर, यावलच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.

दरम्यान, आज दंगल प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात अशोक प्रल्हाद महाजन यांच्या फिर्यादी वरुन सोळा जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दुसर्‍या फिर्याद शेख इमरान शेख फारुख यांच्या फिर्यादी वरुन सतरा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तर सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक यांनी शासनातर्फे फिर्याद दिली असून यात २९ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दंगलीत खूप मोठ्या प्रमाणात संशयितांची संख्या असून त्यांची ओळख पटविण्याचे काम पोलीस प्रशासनातर्फे सुरू आहे.

Protected Content