रावेर प्रतिनिधी । आज दुपारी आलेल्या वादळी पावसाचा तालुक्यातील अनेक गावांना तडाखा बसला असून यामुळे अनेक शिवारांमधील केळी पीकाला मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
आज दिनांक १० रोजी चिनावल , वडगाव ,विवरा ,शेती शिवारात दुपारी २.३० वाजेदरम्यान प्रचंड वादळी पाऊस होऊन यात विवरा शिवारात केळी उत्पादकांची उभी केळी अक्षरक्ष: जमिनदोस्त झाल्याने शेतकर्यांचे लाखो रूपये चे नुकसान झाले आहे. चिनावल येथील आहे यात संदिप सुभाष महाजन, प्रेमचंद मुरलीधर भारंबे ,प्रविण पाटील , रवींद्र भिरूड , निळकंठ नारखेडे यांच्या सह अनेकांचे वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून शेतकर्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यासोबत, निंभोरा, विवरे व वडगाव परिसरात अचानक वादळी पाऊस सुरु झाला यामुळे सुमारे ३५ हेक्टर वरील केळीचे नुकसान झाले आहे. वडगाव मध्ये घराचे किरकोळ नुकसान झाले असून अनेक झाडे उन्मळुन पडले आहे.याची माहिती सौ उषाराणी देवगुणे यांना मिळताच त्यांनी घटनेची पाहणी करण्यासाठी मंडळ अधिकारी सचिन पाटील यांना पाठवून शेतकर्यांना दिलासा दिला. या गावांमध्येही शेतकर्यांना आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.