रावेर : प्रतिनिधी । तालुक्यात सद्या शेतीच्या मशागतीचे काम प्रगतीपथावर आहे. काही शेतकरी शेतात माती टाकत असतील तर खबरदारी घ्या. कारण आज महसूल खात्याने माती वाहतुक करणा-यांवर कारवाई करण्याचे फर्मान काढले आहे.
हे आदेश जारी करताना स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी अधिसूचना क्र / गोखनि / 10 / 1012 / प्र.क / 603 / ख , दि . 11/02/2015 व जिल्हाधिकारी जळगांव ( गौणखनिज शाखा ) यांचेकडील पत्र क्र / गौखनि / ई कावि / 2015 / 8 / 26 / 601 दि . 16/10/2015 अशा पत्रांचा संदर्भ दिला आहे
स्वामीत्वधनाचे दर प्रती ब्रास प्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे . त्यानुसार बहुतांश शेतकरी हे माती या गौणखनिजाचे शेतीच्या मशागतीसाठी वापर करणेकामी उत्खनन करुन ट्रॅक्टर / ट्रक / इतर तत्सम वाहनाव्दारे वाहतुक करीत असल्याचे निदर्शनास आले असुन त्याबाबत वेळोवेळी दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे . रावेर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवहंन करण्यात येते की , शेतीकामी माती वाहतुक करतांना वाहनधारकाकडे रितसर तहसील कार्यालयाची परवानगी असणे आवश्यक आहे . वाहनधारकाकडे अशी परवानगी आढळून न आल्यास संबंधीतावर अवैध गौणखनिजाची वाहतुक केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.