Home आरोग्य रावेर तालुक्यात आठ नवीन कोरोना बाधीत

रावेर तालुक्यात आठ नवीन कोरोना बाधीत

0
41


रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यात आज पुन्हा आठ जण कोरोना पोझिटीव्ह आले असून यामुळे तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्याचे दिसून येत आहे.

आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या आठने वाढल्याचे दिसून आले आहे. यामुळे आजवरच्या बाधीतांची संख्या २१५ इतकी झाली आहे. आज रावेर शहरातील विद्या नगरमध्ये दोन, आहिरवाडी चार तर विवरे एक असे कोरोना पॉझिटीव्ह आले असुन एकाचा पूर्ण पत्ता मिळालेला नाही. या वृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिला आहे. रावेर तालुक्यात आधी कमी प्रमाणात रूग्ण आढळून आले होते. तथापि, अलीकडच्या काळात रूग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. समाधानाची बाब म्हणजे जसे कोरोना बाधीत आढळत आहेत, अगदी त्याच प्रमाणे या विषाणूवर मात करणार्‍यांच्या संख्येत देखील वाढ झाल्याचे अधोरेखीत झाले आहे.


Protected Content

Play sound