रावेर तहसीलात कर्जमाफी योजनचे काम पुर्णत्वाकडे

रावेर प्रतिनिधी । रावेर तहसील कार्यालयात महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेची शेतकऱ्‍यांची आधार प्रणाली अंतीम टप्यात आली आहे. यावर तहसिलदार व कर्मचारी यांनी वेगाने कामे करत शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या आहे.

महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी करून शेतकऱ्यांना चिंता मुक्त केले, परंतु रावेर तालुक्यातील ७२ शेतकऱ्यांची आधार प्रणाली नसल्याने ते या योजनेपासून वंचित होते. अखेर तहसिलदार उषाराणी देवगुणे यांच्या थम्ब प्रणाली करून या शेतऱ्यांच्या समस्या सोडवल्या आहे. आता या योजनेचे काम अंतीम टप्यात आले आहे. या योजनेवर काम करत असतांना इंटरनेट व नादुस्थ थंब सिस्टीमवर कार्यालयीन वेळ सोडून तहसिलदार उषाराणी देवगुणे व विठोबा पाटील यांनी काम केले. आता आधार प्रणाली बाकी असलेले ९ शेतकरी बाकी असून त्यांनी देखील या संदर्भात त्वरीत महसूल प्रशासनाशी संपर्क साधण्याचे अवाहन विठोबा पाटील यांनी केले आहे.

Protected Content