रावेर, प्रतिनिधी । महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव व रावेर तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकानिहाय पूर विमोचन, शोध, व बचावकार्य प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
रावेर तहसील कार्यालय येथे आयोजित कार्यशाळेत राज्य आपत्ती प्रतिसाद दल पदाधिकारी यांनी उपस्थित ग्रामसेवक व प्रशासकीय यंत्रणा कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले. यावेळी तहसिलदार उषाराणी देवगुणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन पी रावळ, कैलास पवार, पाहुणे नायब तहसीलदार संजय तायडे, चंदू पवार,मनोज खारे, विठोबा पाटील प्रविण पाटील, विशाल पाटील यांनी महापूर याविषयावर सखोल मार्गदर्शन केले. सुनील पारधी यांनी भूकंप बाबत माहिती देऊन त्यातून मानवी जीवन वाचविण्याचे उपाय सुचविले. अनिल वाघ यांनी आपत्तीच्या काळात प्रथमोपचार कसे करावे यावर प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यशाळेत सर्व सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, व पोलीस पाटील सेवाभावी संस्था पदाधिकारी उपस्थित होते. योगेश धनगर यांनी आग लागल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती हाताळण्याबाबतचे मार्गदर्शन केले.