शासनाकडून शेतक-यांना दिवाळीत दिलासा ; रावेर तहसिलला अतिवृष्टी अनुदान प्राप्त

 

रावेर, प्रतिनिधी । रावेर तालुक्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात हेक्टरी १० हजार तर बहूवार्षिक पीकासाठी हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाईचे सानुग्रह अनुदान जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

रावेर तहसिलला अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे सानुग्रह अनुदान प्राप्त झाले आहे. पुरवठा अधिकारी हर्षल पाटील मागील तीन दिवसांपासून हे अनुदान शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी काम करीत आहे. रावेर तालुक्याला १ कोटी १३ लाख ३२ हजार ५८८ रूपयांचा निधी तहसील कार्यालयात प्राप्त झाला आहे. जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे १० व १६ जून , १२ व २३ ऑगस्ट , १९ सप्टेंबर व २ ऑक्टोबर रोजी झालेल्या ३३ टक्के नुकसानीचे पंचनामे झालेल्या पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १० हजार रुपये तर बहूवार्षिक पीकासाठी हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाईचे सानुग्रह अनुदान कमाल २ हेक्टर क्षेत्रापर्यंत मंजूर करण्यात आले आहे. संबधित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सानुग्रह अनुदान जमा करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती तहसीलदार उषाराणी देवगुणे व निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिली. दरम्यान यामुळे समाधान व्यक्त होत आहे .

Protected Content