रावेर, प्रतिनिधी । सीसीआयमार्फत सुरु असलेली कापुस खरेदी केंद्र पुन्हा बंद पडले असून रावेर तालुक्यातील सुमारे ९० शेतकरी वंचित राहिले आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील शेतक-यांचा सीसीआय कापुस खरेदी करत होते. यासाठी शासनाने प्रती क्विंटल ५ हजार १९४ रुपये भाव असून लॉकडाउन लागल्या पासुन २१६ शेतक-यांचे ३ हजार ५५३ क्विंटल कापुस खरेदी झाली आहे.परंतु २९/६ पासुन खरेदी केंद्र बंद आहे. यामुळे ९० शेतकरी वंचित राहीले आहेत. येथील ग्रेडर गणेश कराले यांच्याकडून याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही यामुळे शेतक-यांन मधून नाराजीचा सुर उमटत होता.