रावेर, प्रतिनिधी । पिक विम्या संदर्भात सोमवार २६ ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय बैठक बाजार समितीतर्फे बोलवण्यात आली आहे. या बैठकीला खा. रक्षा खडसे, आ. शिरीष चौधरी, आ. चंद्रकांत पाटील, जि. प. अध्यक्षा ना. रंजना पाटील यांच्या प्रमुख उपस्थित बैठक होणार असल्याचे सभापती श्रीकांत महाजन यांनी सांगितले आहे.
केळी पिक संदर्भात हवामानावर आधारित केळी पीक विमा योजनेचे निकष बदलवण्यात आले आहे,हे निकष शेतकऱ्यांना मान्य नसल्याने यासाठी अनेक प्रयत्न होऊनही अपेक्षित यश मिळालेल नसल्याने,याबाबत विचारविनिमय तसेच विमा काढायचा किंवा नाही यावर चर्चा करण्यासाठी तालुक्यातील शेतकरी व लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थित ही बैठक होणार आहे. बैठकीला जि. प. व पं. स. सदस्य तसेच विविध संस्थावर काम करणारे सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्या उपस्थतीत बाजार समितीच्या लिलाव यार्डात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन संचालक मंडळ बाजार समितीच्यावतीने करण्यात आले.