रावेर प्रतिनिधी । रावेर प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा पादुर्भाव टाळण्यासाठी श्री गणेश मुर्तीचे विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी पालिकातर्फे संकलन केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र लांडे यांनी सांगितले.
येत्या १ सप्टेंबर अनंत चतुर्थीच्या दिवशी रावेर शहरातील गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे. यासाठी रावेर नगर पालिका सज्ज झाली असून शहरातील ठिक-ठिकानी गणेश मृर्ती अर्पण संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे.यासाठी पालिके तर्फे अधिकारी व नियंत्रण अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र लांडे यांनी केल्या आहे.
या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या झाल्या नियुक्त्या
कोरोनाच्या पार्श्वभूमी रावेर नगर पालिके तर्फे गणेश विसर्जन साठी जावेद शेख,प्रमोद चौधरी, अतुल चौधरी, दिपक सुरवाडे, युवराज गोयर, मयूर तोंडे, सुभाष महाजन, प्रकाश शिंदे, अशोक महाजन, संकलन केंद्र प्रमुख म्हणून काम पाहणार आहे तर सरफराज तडवी, शामकांत काळे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी पालिके तर्फे मिळाली आहे.
शहरात या ठिकाणी असणार संकलन केंद्र
रावेर शहरातील मराठा मंगल कार्यालय, रोकडा हनुमान मंदीर, अग्रेसन भवन, साई मंदीर अष्टविनायक नगर, महादेव मंदीर संभाजी नगर, स्वामी समर्थ केंद्र विद्या नगर, संत तुकाराम महाराज मंदीर शिवाजी चौक, मारुती मंदीर स्वामी विवेकानंद चौक, आठवडे बाजार फायरस्टेशन, अर्पण संकलन केंद्र उभारण्यात येणार असून अंबिका व्यायाम शाळातर्फे भास्कर महाजन छत्रपती शिवाजी व्यायाम शाळे तर्फे नगरसेवक राजेंद्र महाजन तर , रावेर युवाशक्ती फाऊंडेशन नगरसेवक अँड. सूरज चौधरी फिरते मूर्ती संकलन केंद्र प्रमुख म्हणून काम पाहणार आहे.