रावेर प्रतिनिधी । रावेर शहरात रविवार २२ रोजी झालेल्या दंगलीनंतर पोलिसांनी बुधवारी रात्री राबविलेल्या सर्चिंग ऑपरेशनमध्ये एकूण १ लाख ७७ हजार ४७५ रुपयांचे निळे रॉकेल, पेट्रोल, व डीजेलचा अवैधसाठा मिळून आला आहे. दरम्यान ही दंगल पुर्वनियोजित असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याप्रकरणी आरोपी शेख शरीफ शेख मुस्लीम रा भोईवाडा रावेर याला पोलिसांनी अटक केली असून सर्व अवैध साठा जप्त केला आहे. शहरातील शिवाजी चौकाजवळ रविवारी रात्री दोन समाजाच्या गटात झालेल्या दंगलीनंतर गेल्या पाच दिवसापासून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.
पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरु असून बुधवारी रात्री राबविलेल्या सर्चिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांना ३ हजार १२० लिटर निळे रॉकेल, ८० लिटर पेट्रोल, व ३५ लिटर डीजेल असा एकूण ३ हजार २३५ लिटरचा अवैध विनापरमीट असलेला साठा रात्री ११.४५ बाराच्या सुमारास पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपीच्या घरासमोर झाडाच्या आडोशाला असलेल्या पत्री शेडमध्ये १,०५,३५० रुपये किमतीचे प्रत्येकी २०० लीटरचे एकूण १४ पत्री ड्रम त्यामधे ३०१० लीटर निळे रंगाचे राँकेल, ३८५० रुपये प्लास्टिकचे ६ कँन त्यात एकुण ११० लीटर निळे राँकेल, ६ हजार रूपयांचे २ मोठे कँन ६० लिटर मापाचे त्यामधे ७५ ते ८० लिटर पेट्रोल, २२७५ रुपयचे एक ३५ लीटर मापाची कँन त्यामध्ये ३५ लिटर डिझेल असा अवैध निळे रॉकेल, पेट्रोल, व डीजेलचा साठा मिळून आला आहे. तसेच ६०,००० रुपये किमतीची एक लाल रंगाची एक अँपे मालवाहू रिक्षा क्र. (एमएच १२ एफडी ८१९४) असा एकूण १ लाख ७७ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पो.काँ. सुरेश आनंदा मेढेयांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शेख शरीफ शेख मुस्लीम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितालकुमार नाईक करीत आहेत.